- रहदारीचा रस्ता असल्याने होर्डिंग्ज कोसळून अपघाताची शक्यता…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहूगाव (दि. २५ डिसेंबर २०२४) :- खेड तालुक्यातील श्रीक्षेत्र येलवाडी ग्रामपंचायत हद्दीत वर्दळीच्या रस्त्यालगत तसेच मुख्य चौकात अनेक अनधिकृत तेही धोकादायक जाहिरात फलक लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे अपघाताची भीती व्यक्त केली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने ग्रामपंचायत हद्दीत कोणत्याही प्रकारचे अनधिकृत जाहिरात फलक, होर्डिंग लावण्यास मनाई करण्याचे आदेश दिले आहेत. येलवाडी हद्दीत अनेक जाहिरात फलक होर्डिंग हे अनधिकृत असून, त्यांच्याकडे कसलीही परवानगी नाही. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रहदारी असल्याने होर्डिंग कोसळून एखाद्याचा जीव जाऊ शकतो. त्यामुळे या अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई होणे अपेक्षित आहे.
होर्डिंग्ज धारकांना नोटीस दिलेल्या आहेत. पीडब्ल्यूडीस याबाबत अधिकार आहेत. त्यांच्याशी पत्रव्यवहार केलेला आहे. त्यानंतर काहीं जणांनी होर्डिंग्ज काढले आहेत.
– मा. रणजीत गाडे, सरपंच – येलवाडी ग्रामपंचायत…












1 Comments
Matilda Inglin
You are my inspiration , I possess few blogs and sometimes run out from to post .