- प्रदेशाध्यक्षांनी स्वबळाचा चेंडू सरकविला कार्यकर्त्यांच्या कोर्टात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ डिसेंबर २०२४) :- आता गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढच्या काही महिन्यांत होण्याची शक्यता आहे. विधानसभेच्या निवडणुकीप्रमाणे महायुती एकत्र लढणार की स्वतंत्र? याबाबत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सूचक विधान केले आहे.
माध्यमांशी संवाद साधताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात आणि महायुतीच्या फॉर्म्युल्याबाबत मोठं भाष्य केलं आहे. आम्ही कोणताही निर्णय राज्यावर लादणार नाहीत. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबात कोणताही निर्णय राज्यावरून होणार नाही. मी आता माध्यमांच्या समोर सांगत आहे की महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आमचे जिल्हा पातळीवरील पदाधिकारी जो निर्णय घेतील तोच निर्णय भारतीय जनता पार्टी करेल”, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणासंदर्भातील सुनावणी अंतिम टप्यात आहे. जर याबाबतचा निर्णय जानेवारीत झाला तर मार्च-एप्रिलपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निवडणूक आयोग घेईल, असं मला वाटतं. मात्र, सर्वोच्या न्यायालयाने निर्णय दिला तर मार्च-एप्रिल पर्यंत निवडणुका होऊ शकतात, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
















3 Comments
tlover tonet
F*ckin’ amazing issues here. I’m very happy to look your post. Thanks so much and i’m taking a look forward to touch you. Will you please drop me a e-mail?
Free Baseball Streaming Website
amei este site. Para saber mais detalhes acesse nosso site e descubra mais. Todas as informações contidas são informações relevantes e exclusivas. Tudo que você precisa saber está está lá.
Live MotoGP Stream
Este site é realmente fascinate. Sempre que consigo acessar eu encontro coisas incríveis Você também pode acessar o nosso site e descobrir mais detalhes! conteúdo único. Venha descobrir mais agora! 🙂