न्यूज पीसीएमसी नेटवर्क
हिंजवडी (दि. २५ डिसेंबर २०२४) :- “तु मेरे घर में क्या कर रहा हैं, तु मेरे बीबी को क्यु गंदींगंदी गाली दे रहा हैं, आज तुझे मे जान से मार डालता हु”, अशी तरुणाला दमबाजी देत त्यांच्यावर कात्रीने हल्ला करीत त्यांना गंभीर जखमी केले आहे.
हा प्रकार (दि. २३) टायटानीक पार्क, शिंदेवस्ती, मारुंजी येथे घडला. खाणावळीमध्ये काम करणाऱ्या महिलेच्या राहत्या घरी तक्रारदार तरुण हा त्यांना बोलाविण्यास गेला असता घरी येणाच्या कारणावरुन त्यांच्यात शाब्दीक भांडणे झाली होती.
या वादाबाबत एकाने महिलेच्या पतीला कळविला. याप्रकरणी प्रोसनजित बिश्वास यांनी शुभंकर मंडल याच्या विरोधात तक्रार दिली आहे. हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


















