- ‘बीएआय शिर्के अवॉर्ड्स बिल्ड स्ट्रक्चर’ पुरस्काराने सन्मानित…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ डिसेंबर २०२४) :- एस. बी. ग्रुपच्या सिल्वर प्रमोटर्स अॅण्ड डेव्हलपर्सच्या सिल्वर गार्डीनिया गृहप्रकल्पाला बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया (बीएआय) यांच्या माध्यमातून बी ए आय शिर्के अवॉर्ड्स बिल्ड स्ट्रक्चर कॉम्पिटिशनमध्ये २०२४ मध्ये पुणे जिल्ह्यात तृतीय क्रमांकाने सन्मानित करण्यात आले. पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्रात अतिशय उल्लेखनीय काम केल्याबद्दल ‘प्राइड वर्ल्ड’ने प्रथम, ‘न्याती ग्रुप’ने द्वितीय आणि ‘सिल्वर ग्रुप’ने तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळवला.
सिल्वर ग्रुपचे अध्यक्ष संतोष बारणे म्हणाले, ‘स्वप्न तुमचे, विश्वास आमचा ह्या धर्तीवर काम करणाऱ्या एस बी ग्रुपच्या सिल्वर प्रमोटर्स अँड डेव्हलपर्सच्या ‘सिल्वर गार्डीनिया’ गृहप्रकल्पाला ‘बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया’ (बी ए आय) यांच्या माध्यमातून २०२४ च्या बी ए आय शिर्के अवॉर्ड्स बिल्ड स्ट्रक्चर कॉम्पिटिशनमध्ये पुणे जिल्ह्यात तृतीय क्रमांकाने सन्मानित करण्यात आले. जेव्हा आपले काम प्रामाणिकपणे, समर्पण आणि विश्वासाने केले जाते, तेव्हा त्याचे योग्य फळ मिळते. सिल्वर गार्डीनिया प्रकल्पाच्या निर्मितीमध्ये उच्च दर्जाचे काम, कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था, त्यांच्या आरोग्याची काळजी, तसेच कुटुंबांच्या आरोग्याची काळजी घेणारा प्रकल्प बनविण्यात आला. सुरक्षेच्या सर्व बाबींचे काटेकोर पालन केले गेले आणि त्या उत्तम दर्जाच्या प्रकल्पामुळे ग्राहकांच्या पसंतीस उतरला. विशेषतः पिंपरी चिंचवड शहरात हा प्रकल्प महत्त्वाकांक्षी मानला जात आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून एक वेगळी ओळख निर्माण करण्यात आली आहे.
सिल्वर ग्रुपचे अध्यक्ष, संतोष बारणे यांचा जन्म एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला. या क्षेत्राची कोणतीही पार्श्वभूमी नसताना त्यांनी आपल्या बुद्धीमत्ता आणि चिकाटीच्या जोरावर बांधकाम क्षेत्रात विशिष्ट स्थान प्राप्त केले आहे. आई-वडिलांचे आशीर्वाद, प्रामाणिकपणे केलेले काम, प्रत्येक ग्राहकाला दिलेला शब्द पाळणे, आणि वेळेचे योग्य नियोजन यामुळे आज हे यश मिळाले आहे. हा पुरस्कार मी माझ्या कुटुंबासह आणि माझ्या सर्व टीमला समर्पित करतो, ज्यात सर्व इंजिनियर्स, मार्केटिंग टीम, बांधकाम कर्मचारी आणि कॉन्ट्रॅक्टर्सचा समावेश आहे. सिल्वर ग्रुप नेहमीच उत्कृष्टतेचा आदर्श ठेवत, आपल्या कार्यक्षेत्रात नागरिकांना नवनवी सेवा देत आहे.














