न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ डिसेंबर २०२४) :- गुंगीचे औषध देवुन चोरी करण्याऱ्या नोकरासहा इतर तिघांना अटक करून ४ वाहने व सोन्याचे दागिणे ८,५१,००० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यास पिंपरी चिंचवड, गुन्हे शाखा, युनिट १ ला यश आले आहे.
रफिक उमर जमादार (वय ३७ वर्षे, रा. तुपेवस्ती, टोल नाक्या जवळ, मोशी) हा चोरीच्या गुन्हयातील सोन्याचे दागिणे विक्री करीता राम मैदान, जाधववाडी, चिखली येथे थांबला होता. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या दुचाकीच्या डिक्कीत एका प्लॅस्टीकच्या पिशवीत एक सोन्याचे ब्रेसलेट, एक गळयातील सोन्याचे चैन गणपतीचे पॅडल असा एकुण ५,३१,००० रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे जप्त करण्यात आले आहेत. याबाबत वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. तो उघडकीस करण्यात आला आहे.
दुचाकी गाडी ही चोरीची असून आरोपी रफिकने त्याचे साथीदारा १) निलेश मनोहर गायकवाड २) ईश्वर संजय पवार यांच्यासह त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणावरुन दुचाकी वाहने चोरी केली असल्याचे उघड झाले. त्यांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडून दुचाकी वाहने मेस्ट्रो, रॉयल इनफिल्ड, हिरो स्प्लेंडर, हिरोहोंडा पेंशन प्रो अशी ०४ दुचाकी वाहने असा ३,२०,०००/- रुपयेचा मुद्देमाल हस्तगत करुन दुचाकी वाहन चोरीचे गुन्हे उघड केले आहेत.
आरोपी रफिक विरुध्द पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत वाहन चोरीचे एकुण ०७ गुन्हे नोंद असुन २) निलेशविरुध्द पिंपरी चिंचवड व पुणे शहर पोलीस आयुक्ताल तसेच पुणे ग्रामीण हद्दीत वाहन चोरी, घरफोडी, जबरीचोरी, दरोडयाची तयारी असे एकुण ३४ गुन्हे नोंद आहेत.











