न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ डिसेंबर २०२४) :- पुणे मेट्रोच्या पिंपरी ते निगडी येथील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकापर्यंत मेट्रो मार्गाचे काम वेगात सुरू आहे. आतापर्यंत २८ फाउंडेशनचे काम पूर्ण झाले आहे. तर, १३ पिलर उभे करण्यात आले असून, २०१ सेग्मेंट कास्टिंग करण्यात आले आहे.
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन (महामेट्रो) कडून पुणे मेट्रो प्रकल्पाच्या पिंपरी ते स्वारगेट या टप्पा क्रमांक एकचे काम सप्टेंबर २०२४ रोजी पूर्ण होऊन प्रवासी वाहतूक सुरुवात झाली आहे. या मार्गावर प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. हा मार्ग निगडीपर्यंत वाढविण्यात येणार आहे. पिंपरी ते निगडीतील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकापर्यंत ४.५१९ किलोमीटर अंतराचे काम सुरू झाले आहे. हा मार्ग उन्नत (इलीव्हेटेड) आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका आणि वाहतूक पोलिसांकडून आवश्यक त्या परवानगी मिळाल्या आहेत. निगडीतील भक्ती-शक्ती समूह शिल्प, आकुर्डी येथील बजाज ऑटो कंपनीसमोर,
तेरा पिलरची उभारणी पूर्ण काळभोरनगर येथे फाउंडेशन घेऊन पिलर उभारणीचे काम सुरू आहे. ही कामे वेगाने पूर्ण करण्यात येत आहेत. या मार्गावरील १५१ पैकी आतापर्यंत १३ पिलर उभे करण्यात आले आहेत. तर, २८ फाउंडेशन करण्यात आले आहेत. कास्टिंग यार्ड येथे २०१ सेगमेंट तयार करण्यात आले आहेत.












1 Comments
Christy Hopple
I discovered your weblog web site on google and examine a number of of your early posts. Proceed to keep up the superb operate. I simply extra up your RSS feed to my MSN Information Reader. In search of forward to studying extra from you in a while!…