- संबंधित गुन्हेगाराला तत्काळ बेड्या ठोकण्याचा पोलीस आयुक्तांचा आदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ डिसेंबर २०२४) :- सराईत गुन्हेगाराने साथीदारांच्या मदतीने एकावर खुनी हल्ला चढवला. ही घटना रविवारी (दि. २२) काळेवाडी येथे घडली. दरम्यान, शहरातील एका बड्या नेत्याने स्थानिक पोलिसांवर दबाव टाकल्याने सराईत गुन्हेगाराचे नावच गुन्ह्यातून वगळले. याबाबत माहिती मिळताच पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी संबंधित गुन्हेगाराला तत्काळ बेड्या ठोकण्याचे आदेश दिले. तसेच, राजकीय दबावाला बळी पडणाऱ्या पीएसआयचे तडकाफडकी निलंबनदेखील केले आहे.
या प्रकरणातील आरोपी प्रशांत दिघे हा पिंपरी-चिंचवड शहरातील एक कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, हत्यारबंदी, जबरी चोरी यांसारखे १९ गंभीर गुन्हे दाखल आहेत. रविवारी (दि. २२) रात्री काळेवाडी येथे दोन गटात हाणामारी झाली होती. यामध्ये आरोपीने एका व्यक्तीचा खून करण्याचा प्रयत्न केला. मात्र, राजकीय हस्तक्षेपामुळे पीएसआय सचिन चव्हाण यांनी त्याचे नाव गुन्ह्यातून वगळले होते.
आपण सांगूनही कारवाई केल्याचा राग आल्याने संबंधित लोकप्रतिनिधीने पोलिस प्रशासनावर पक्षपातीपणाचा आरोप केला आहे. तसेच, पोलिस हप्तावसुली करत असल्याचेही जाहीररीत्या सांगितले. मात्र, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी राजकीय दबाव झुगारल्याने आरोप होत समोर आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.
या प्रकरणाची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी तातडीने कारवाई करत चव्हाण यांना निलंबित केले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राजकीय दबावाला न जुमानता कठोर पावले उचलल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.













1 Comments
tlover tonet
You have brought up a very good details , thankyou for the post.