न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ डिसेंबर २०२४) :- काम करीत असताना उंचावरून पडल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १५ डिसेंबरला दुपारी दोन वाजताच्या सुमारास तापकीरनगर, मोशी येथे घडली.
आकाशकुमार यादव (१९, रा. तापकीरनगर, मोशी, मूळगाव ग्राम व पो. सिसई, ता. गोरया गोसी, जि. सिवान राज्य बिहार) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. पोलिस हवालदार किशोर रघुनाथ वाव्हळ (वय ५१) यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गणेश सयाजी वाडेकर (३४, रा. पद्मावती, चिंबळी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक्सलंट इंजिनिअर शॉप, तापकीरनगर मोशी येथे पत्र्याच्या शेड फेब्रिकेशनचे काम करीत असताना आकाश हा उंचावरून टाकीवर पडल्याने त्याच्या डोक्याला मार लागून त्याचा मृत्यू झाला. संशयित आरोपी गणेश वाडेकर याने उंचावर काम करीत असताना आकाश याला संरक्षणाची साधने दिली नव्हती. तसेच उंचावरील काम करताना शेडला खाली संरक्षण जाळी न बसवता निष्काळजीपणे त्याला काम करण्यास लावले.













1 Comments
tlover tonet
Very efficiently written information. It will be beneficial to anybody who employess it, as well as myself. Keep doing what you are doing – for sure i will check out more posts.