- पीएमआरडीएकडून वाकड येथील १५ एकर भूखंडाचा पोलिसांना आगाऊ ताबा..
- विकासकामांचा आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू – पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ डिसेंबर २०२४) :- पिंपरी चिंचवड पोलीस उप आयुक्त, परिमंडळ दोन कार्यालय, इतर अनुषंगिक कार्यालय व पोलीस अधिकारी यांच्या निवासस्थानासाठी वाकड, कस्पटे वस्तीरोड येथील पेठ क्रमांक ३९ मधील सर्व्हे नंबर २०८ आणि २०९ डिस्टिक्ट सेंटरमधील १५ एकर जागा शासनाने मंजूर केली आहे. या जागेचा केवळ दीड वर्षातच आगाऊ ताबा पीएमआरडीएने पिंपरी चिंचवड पोलिसांना शुक्रवारी (दि. २७) रोजी दिला आहे. या जागेसाठी वाणिज्यिक दराने २४९.१२ कोटी रुपये शासन देणार आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाची स्थापना सुमारे सहा वर्षांपूर्वी झाली. पोलीस आयुक्त कार्यालय, पोलीस अधिकारी यांच्या निवासस्थानासाठी तसेच पोलीस विभागाचे मुख्यालय इतर कार्यालयांसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध नव्हती. त्यामुळे प्रशासकीय कामकाज करणे व कामकाज सुरळीतपणे चालवण्यामध्ये खूप मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या. याप्रकरणी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी डिसेंबर २०२२ मध्ये पोलीस आयुक्तालयाचा कारभार हाती घेतल्यानंतर त्यांच्या प्रयत्नाने पिंपरी चिंचवड शहरात जागेचा शोध सुरू होता. याप्रकरणी पोलीस आयुक्तांनी दिनांक ५ एप्रिल २०२३ रोजी १५ एकर जागेसाठी पीएमआरडीकडे प्रस्ताव दिला होता. पीएमआरडीएने मुख्यमंत्री यांच्या अधिपत्याखालील नगर विकास विभाग, मंत्रालय मुंबई यांच्याकडे प्रस्ताव पाठवला होता. उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री यांच्याकडेदेखील आयुक्तांनी वैयक्तिक पाठपुरावा केला. त्याबाबत अर्थसंकल्पामध्ये मंजुरी देण्यात आली होती.
पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त मुख्यालय विवेक पाटील, पोलीस उपायुक्त मंडळ दोन विशाल गायकवाड, पोलीस उप आयुक्त परिमंडळ तीन डॉ. शिवाजी पवार, पोलीस निरीक्षक विकास राऊत या सर्वांनी वैयक्तिकरित्या मंत्रालय येथे संबंधित खात्याशी वेळोवेळी पाठपुरावा करून कार्यवाही केली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त, मुख्यालय, पिंपरी चिंचवडचे विवेक पाटील यांनी दिली आहे.
या जागेमध्ये पोलीस उपायुक्त, परिमंडळ मंडळ दोन यांचे कार्यालय, गुन्हे शाखेचे अंमली पदार्थविरोधी तसेच खंडणी विरोधी पथकाची कार्यालयं, वाहतूक विभाग तसेच इतर अनुषंगिक कार्यालये आणि विविध कार्यक्रम आयोजित करण्यासाठी मल्टीपर्पज हॉल, कॅफेटेरिया, जॉगिंग ट्रॅक, तसेच मुलांसाठी खेळाचे मैदान इत्यादी सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. पोलीस आयुक्त ते सहाय्यक पोलीस आयुक्त, अधिकारी यांच्यासाठी येथे निवासस्थानेसुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यासाठी आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. – मा. विनयकुमार चौबे, (पोलीस आयुक्त)…













3 Comments
tlovertonet
I like the valuable info you provide in your articles. I’ll bookmark your blog and check again here regularly. I’m quite certain I will learn lots of new stuff right here! Best of luck for the next!
Renaldo Keer
This web site is my inhalation, very excellent style and perfect subject material.
Watch MMA Online
fascinate este conteúdo. Gostei bastante. Aproveitem e vejam este site. informações, novidades e muito mais. Não deixem de acessar para descobrir mais. Obrigado a todos e até a próxima. 🙂