न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ डिसेंबर २०२४) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत डॉ. मनमोहन सिंग यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
पिंपरी येथील महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, चंद्रकांत इंदलकर यांनी दिवंगत पंतप्रधान डॉ.
मनमोहन सिंग यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
यावेळी उपआयुक्त अण्णा बोदडे, सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह विविध विभागातील कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते.












