- तब्बल चार तास वाहतूकीचा खोळंबा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ डिसेंबर २०२४) :- जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर निगडी येथे भक्त्ती-शक्ती उड्डाणपुलावर शनिवारी सकाळी सिमेंट क्रशने भरलेला एक डंपर उलटला. हा अपघात तळेगावहून पुण्याकडे येणाऱ्या मार्गावर झाला. यात डंपर चालक व क्लेिनर जखमी झाले.
अपघातामुळे परिसरात चार तास वाहतूक खोळंबली होती. भक्ती-शक्ती उड्डाणपुलावर तळेगावहून पुण्यात येणाऱ्या मार्गिकेवर शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास सिमेंटने भरलेल्या भरधाव डंपरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने तो उलटला. रस्त्यावर सिमेंट क्रशचा ढिगारा पडला होता. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिस, अग्निशमन दल, आरोग्य कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दोन क्रेनच्या मदतीने उलटा झालेला डंपर रस्त्यातून बाजूला हटवून वाहतूक सुरळीत केली.
तोपर्यंत अन्य मार्गावर वाहतूक वळवून वाहतुकीवरील ताण कमी करण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. रस्त्यातील अपघातग्रस्त डंपर बाजूला हटविल्यानंतर डंपरचे सांडलेले ऑइल साफ करण्यात आले. तसेच रस्त्यात सांडलेला सिमेंट क्रशचा ढीग जेसीबीच्या साह्याने बाजूला केला. निगडी पोलिस, अग्निशमन दल, मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्यात आली. वाहतूक सुरळीत करण्यास तब्बल चार तासांचा कालावधी गेला. निगडी येथील मधुकरराव पवळे उडाणपुलाखाली मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. मार्ग काढताना चालकांना त्रास झाला.













1 Comments
Mark Gasiorowski
Hi there, I found your web site via Google while looking for a related topic, your site came up, it looks great. I have bookmarked it in my google bookmarks.