- आमदार सुनील शेळके यांची पीएमआरडीएच्या बैठकीत सूचना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
आकुर्डी (दि. २९ डिसेंबर २०२४) :- इंद्रायणी, पवना नदी सुधार प्रकल्पांचे आराखडे तयार करून शासनास सादर करावेत. नद्यांमध्ये थेट दूषित पाणी, सांडपाणी सोडण्यात येत असेल त्या ठिकाणी एसटीपी प्लांट्स बसवावेत, या कामास सुरुवात केल्यास काही प्रमाणात नदी प्रदूषणास आळा बसेल, अशी सूचना आमदार सुनील शेळके यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बैठकीत केली.
आमदार सुनील शेळके, पीएमआरडीएचे आयुक्त योगेश म्हसे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मुख्य अभियंता अशोक भालेकर, सल्लागार विवेक
खरवडकर, कार्यकारी अभियंता वसंत नाईक, वरिष्ठ अभियंता सुजय शेवाळे, नगररचना उपसंचालक सोनाली आहेर, एकवीरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळे, माजी नगराध्यक्ष कृष्णा कारके, सुदर्शन खांडगे, मारुती देशमुख, संजय बाविस्कर उपस्थित होते.
‘पीएमआरडीए’ अंतर्गत मावळ तालुक्यात झालेल्या रस्त्यांच्या कामांबाबत चर्चा झाली. या रस्त्यांच्या कामाच्या गुणवत्तेबाबत तक्रारी येत असून, कामाचा दर्जा सुधारण्याची गरज आहे. या कामांचे थर्ड पार्टी ऑडिट करण्यात यावे, अशी सूचना आमदार शेळके यांनी केली. नदी सुधार, ऐतिहासिक तलावांचे पुनरुज्जीवन, बैलगाडा घाट आदींसाठी निधीची तरतूद करावी, असेही त्यांनी शेळके यांनी सांगितले.
तालुक्यात मोठे गृह प्रकल्प उभारले जात असून, अनेक ठिकाणी विकासकांकडून संपूर्ण भौतिक सुविधा दिलेल्या नसतानाही पूर्णत्वाचा दाखला देण्यात येतो. यापुढे प्रकल्पांना पूर्णत्वाचा दाखला देताना प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून सर्व गोष्टींची शहानिशा करूनच दाखले द्यावेत, या प्रक्रियेची तत्काळ अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी शेळके यांनी केली.













1 Comments
tlovertonet
Helpful info. Lucky me I found your site unintentionally, and I’m surprised why this coincidence did not happened in advance! I bookmarked it.