न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ डिसेंबर २०२४) :- आकुर्डी रेल्वे स्टेशन येथील गुरुद्वारा चौकातील एका घराच्या छतावर पेंटिंगचे काम सुरु होते. सुरक्षीततेसाठी पेंटरला विद्युत रोधक ग्लोज, गम बूट दिले नाहीत.
तसेच घराशेजारून गेलेल्या हाय टेन्शन विद्युत वायर संबंधित देखील कोणतीच कल्पना दिली नाही. त्यामुळे त्यांची सुरक्षितता धोक्यात येईल असे काम आरोपीने केले आहे.
दरम्यान काम करीत असताना हाय टेन्शन वायरचा करंट लागून पेंटर गंभीर जखमी झाला आहे. हा प्रकार (दि. ५) रोजी सकाळी ११ वाजता घडला. याप्रकरणी महिला फिर्यादी यांनी आरोपी किरण प्रभाकर चिंचवडे (रा. वाल्हेकरवाडी चिंचवड) यांच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे. चिंचवड पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे.













1 Comments
tlovertonet
Some really superb information, Gladiolus I observed this. “We must learn our limits. We are all something, but none of us are everything.” by Blaise Pascal.