- पालिकेच्या आवाहनास दाखविली जातेय केराची टोपली…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ डिसेंबर २०२४) :- पिंपरी-चिंचवड शहरातील रुग्णालयाच्या अग्निसुरक्षेचा आढावा घेण्याचे आदेश पालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिले होते. गेल्या सहा महिन्यांमध्ये ६२३ रुग्णालयांपैकी ५६८ रुग्णालयांना पत्र देण्यात आले. यामधील फक्त ५६ रुग्णालयांनी अग्निशामक यंत्रणा बसविली असल्याचे समोर आले.
शहरात एकूण किती रुग्णालये आहेत, त्यापैकी किती रुग्णालयांमध्ये सक्षम अग्निरोधक यंत्रणा आहे, याची माहिती घेण्याचे आदेश त्यांनी वैद्यकीय विभाग आणि अग्निशमन विभागास दिले होते.
महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे ६२३ रुग्णालयांची नोंद आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये ५६८ रुग्णालयांना अग्निशमन विभागाकडून अग्निरोधक यंत्रणा बसविण्याबाबत पत्र देण्यात आले.
या पत्राची दखल घेत १८४ रुग्णालयांची ना हरकत प्रमाणपत्र मिळविण्याबाबत अनिशमन विभागाकडे अर्ज दाखल केला. अग्निशमन विभागाने रुग्णालयांची पाहणी करून रुग्णालयाच्या यंत्रणेमध्ये त्रुटी असल्याचे दिसून आले. या त्रुटी दूर करण्यासाठी संबंधित रुग्णालयांना सांगण्यात आले.
आतापर्यंत केवळ ५६ रुग्णालयांमध्ये अग्निरोधक यंत्रणा सक्षम असल्याचे दिसून आले. तसेच शहरातील ४६८ रुग्णालयांना सहा महिन्यांपूर्वी दिलेल्या पत्रांनंतर आता नोटीस बजावली आहे.
शहरातील रुग्णालयांना पत्र दिल्यानंतरही काही रुग्णालयांनी अग्निरोधक यंत्रणा बसविली नाही, त्यामुळे त्यांना नोटीस देण्याचे काम सुरू आहे. जर नोटीस दिल्यानंतरही त्यांनी अग्निरोधक यंत्रणा बसविली नाही. तर त्या रुग्णालयाच्या परवान्याचे नूतनीकरण करू नये, असे वैद्यकीय विभागास कळविणार आहे.
– मनोज लोणकर, उपायुक्त, अग्निशमन विभाग…













2 Comments
Elden Tyrell
I just like the helpful information you provide in your articles. I will bookmark your blog and take a look at again here regularly. I’m quite sure I’ll be told a lot of new stuff proper here! Good luck for the following!
Live American Football Online
fascinate este conteúdo. Gostei muito. Aproveitem e vejam este conteúdo. informações, novidades e muito mais. Não deixem de acessar para saber mais. Obrigado a todos e até a próxima. 🙂