न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ मे २०१९) :- घर मालकाने भाडेकरूला खोली रिकामी करण्याच्या कारणावरून शिवीगाळ करत लोखंडी गजाने मारहाण केली. दत्तात्रय दगडू पाचंगे (वय ३७, रा. तुपेवस्ती, मोशी) असे जखमी भाडेकरूचे नाव आहे.
ही घटना रविवारी रात्री अकराच्या सुमारास मोशी येथील तुपेवस्ती मध्ये घडली. त्यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार राम सुरेश अवचीते (वय ३५, रा. तुपेवस्ती, मोशी), शहा (पूर्ण नाव पत्ता माहीती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.











