न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ मे २०१९) :- पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन वारंवार त्रास दिला. वेळोवेळी शिवीगाळ व मारहाण केली. तसेच पत्नीला खालच्या जातीची असल्याचे सतत बोलून तिला जातीवाचक शिवीगाळ केली. याप्रकरणी पतीसह चार जणांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पती, नणंद सोनाली बेदरकर, सुनील बेदरकर, उज्वला विनायक निघोजकर (रा. रांजणगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना जुनी सांगवी येथे घडली. याप्रकरणी ३२ वर्षीय महिलेने सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सांगवी पोलीस पुढील तपास करीत आहेत.











