- अवैधपणे हुक्का विक्री करणाऱ्या हॉटेलच्या चालक मालकासह मॅनेजरवर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० डिसेंबर २०२४) :- हिंजवडी पोलिसांनी ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरात अवैधपणे हुक्का व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व्यवसायिकांवर कारवाईचा धडाका सुरू केलेला आहे. एकाच दिवशी पोलिसांनी पहाटेच्या सुमारास वाकड येथील दोन हॉटेलवर छापामारी केली आहे.
इथे आलेल्या ग्राहकांना पिण्यासाठी अवैधरित्या हक्का पुरवण्यात आलेला होता. तसेच ज्वलनशील पदार्थांबाबत मार्गदर्शक सूचनांकडे देखील या हॉटेल चालकांनी दुर्लक्ष केल्याचे कारवाईत निदर्शनास आले. पोलिसांनी दि. २८ ते रोजी रात्री ११.५० ते २९ रोजी पहाटे २:०० च्या दरम्यान या दोन्ही हॉटेलवर ही कारवाई केली.
या प्रकरणी हॉटेलचा मॅनेजर सुदर्शन दयानंद किनीकर तसेच चालक-मालक तुषार भूमकर आणि आणखी एका हॉटेलचा मॅनेजर राकेश नंदकुमार शेट्टी तसेच वेटर युवराज दीपक खडका या चौघांच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपी अटकेत नाहीत.
याप्रकरणी पोलिसांच्या गुन्हे शाखा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पोह. भगवंता मुठे आणि हिंजवडी पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई अजिंक्य शिंदे यांनी फिर्याद नोंदवली आहे. दोन्ही घटनांचा तपास मसपोनि जाधव हे करीत आहेत.













3 Comments
tlovertonet
Very interesting information!Perfect just what I was looking for! “If you want to test your memory, try to recall what you were worrying about one year ago today.” by Rotarian.
Jenifer Lindler
It’s hard to find knowledgeable people on this topic, but you sound like you know what you’re talking about! Thanks
Watch Motor Racing Live Stream
me encantei com este site. Pra saber mais detalhes acesse nosso site e descubra mais. Todas as informações contidas são conteúdos relevantes e exclusivas. Tudo que você precisa saber está está lá.