- भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्त्यांना आवाहन…
- भाजयुमोची पुण्यात ‘भाजपा सदस्य नोंदणी अभियान’ कार्यशाळा उत्साहात संपन्न..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. ३१ डिसेंबर २०२४) :- भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून प्रत्येक कार्यकर्ता आणि पदाधिकारी हा पक्षाचा आधारस्तंभ आहे. भाजपची संघटना अधिक बळकट व्हावी आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाचे वर्चस्व वाढावे, यासाठी सदस्य नोंदणी अभियान महत्त्वपूर्ण आहे. कार्यकर्त्यांनी आपल्या मेहनतीने विधानसभा निवडणुकीत मोठे यश संपादन केले. याच ऊर्जा आणि एकजुटीच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्येही यश मिळवण्यासाठी प्रत्येकाने घराघरात पोहोचण्याचे काम या सदस्यता अभियानाद्वारे करावे, असे आवाहन सामाजिक न्याय व अल्पसंख्यांक राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी केले.
भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने नुकतीच पुण्यात भाजपा सदस्य नोंदणी अभियानाची कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेस संबोधित करताना राज्यमंत्री माधुरी मिसाळ बोलत होत्या. यावेळी भाजपा महासचिव तथा विधान परिषद आमदार विक्रांत दादा पाटील, भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष अनुप मोरे, प्रदेश सरचिटणीस सुदर्शन पाटसकर, निखिल चव्हाण, योगेश मैंद, बादल कुलकर्णी, प्रदेश उपाध्यक्ष अरुण पाठक, निवेदिता एकबोटे, अमृत मारणे, प्रिया पवार,प्रदेश सचिव रोनक शेट्टी, पुणे शहर युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष करण मिसाळ, पिंपरी चिंचवड युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राज तापकीर, पुणे ग्रामीण उत्तर युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप सातव, पुणे ग्रामीण दक्षिण युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष साकेत जगताप तसेच भाजयुमो प्रदेश पदाधिकारी, जिल्हा कार्यकारणी, मंडल अध्यक्ष, सरचिटणीस आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
आ. विक्रांत पाटील म्हणाले, बुथ लेवलपासुन तालुका, जिल्हा, तसेच प्रदेश व राष्टीय लेवलच्या पदाधिका-यांच्या परिश्रमामुळेच भारतीय जनता पार्टी जगातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे. दर तीन वर्षांनी पक्षाच्या वतीने नवीन सदस्यता मोहीम राबविली जाते. डिसेंबर महिन्यात भाजपा सदस्यता मोहिमेला सुरुवात झाली आहे. नवीन सदस्य नोंदणी उद्दिष्ट पूर्तीसाठी भाजपाच्या प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्त्याने या अभियानात सहभागी होऊन नविन सदस्यता मोहीम यशस्वी करावी. सदस्य नोंदणी मोहिमेला गती द्यावी आणि अधिकाधिक लोकांना भाजपशी जोडण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय योगदान द्यावे.
भाजयुमो प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे मार्गदर्शन करताना म्हणाले, युवा मोर्चाने प्रत्येक बुथवर नवीन सदस्य नोंदणीसाठी कार्यशाळेचे आयोजन करावे. नोंदणी अँड्रॉइड मोबाईलवर ऑनलाइन पद्धतीने करावयाची आहे. ‘सक्षम भाजपा समृद्ध भाजपा’, आगामी काळात ‘शत प्रतिशत भाजपा’ हा उद्देश सफल करण्यासाठी या अभियानाची व्याप्ती आवश्यक आहे. आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी हे अभियान लाभदायक ठरणार आहेत. युवा मोर्चाची जबाबदारी अभियानात महत्वाची आहे.
युवा मोर्चाच्या वतीने एकाच दिवसात तब्बल ७० हजार सदस्यता नोंदणी करण्यात आली. यावेळी आयोजित कार्यशाळेत बहुसंख्य युवकांचा पक्षप्रवेश देखील करण्यात आला. दरम्यान 8800002024 या मोबाईल क्रमांकावर ‘मिस कॉल’ देत सदस्यता नोंदणीबाबत उपस्थितांना आवाहन करण्यात आले.














2 Comments
tlovertonet
The next time I read a blog, I hope that it doesnt disappoint me as much as this one. I mean, I know it was my choice to read, but I actually thought youd have something interesting to say. All I hear is a bunch of whining about something that you could fix if you werent too busy looking for attention.
Susy Sarmiento
Its like you read my mind! You seem to know a lot about this, like you wrote the book in it or something. I think that you could do with a few pics to drive the message home a little bit, but instead of that, this is magnificent blog. A great read. I’ll certainly be back.