न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ डिसेंबर २०२४) :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील चार पोलीस अधिकारी आणि अंमलदार नियत वयोमानाने आज मंगळवारी (दि. ३१) सेवानिवृत्त झाले आहेत.
त्यात श्रेणी पोलीस उपनिरीक्षक अनिल अल्हाट, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक अशोक बिबे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक नवनाथ अडसूळ आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रत्नाकर गजभिव या पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांचा समावेश आहे.
त्यांचा सत्कार व निरोप समारंभ पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवनेरी सभागृह येथे संपन्न झाला. यावेळी पोलीस उप आयुक्त मुख्यालयाचे विवेक पाटील यांच्या हस्ते सेवानिवृत्तांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त मुख्यालय विवेक पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन लांडगे, पोलीस आयुक्तालयातील कर्मचारी व सेवानिवृत्तांचे नातेवाईक उपस्थित होते.














1 Comments
tlover tonet
What i do not understood is in fact how you’re not actually much more well-preferred than you might be now. You are very intelligent. You understand thus considerably on the subject of this topic, produced me personally believe it from so many varied angles. Its like women and men don’t seem to be interested except it’s one thing to accomplish with Girl gaga! Your own stuffs great. All the time deal with it up!