- ठेकेदारासह सुपरवायझरवर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ जानेवारी २०२५) :- बांधकाम प्रकल्पाच्या आठव्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू झाल्याप्रकरणी कंत्राटदार व सुपरवायझरवर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना १ ऑगस्ट २०२४ रोजी पुनावळेतील ढवळेनगर येथे घडली होती. तक्रार अर्जाच्या चौकशीनंतर सोमवारी (दि. ६) या प्रकरणी रावेत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
जसवंत मुकुंदा यादव (वय ३०, रा. पुनावळे) असे या घटनेत मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी संतोष मुकुंदा यादव (वय ३९, रा. छत्तीसगड) यांनी रावेत पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यानुसार कंत्राटदार आनंद मारुती गाडे (वय ४७, रा. मधुबन सोसायटी, जुनी सांगवी, मूळ-बीड) आणि सुपरवायजर देवप्पा आयप्पा अंबीगर (वय ४२, रा. सूसरोड, पाषाण, मूळ-कर्नाटक) यांच्यावर ६ जानेवारीला रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.
फिर्यादी संतोष यांचे भाऊ जसवंत हे पुनावळेतील ढवळेनगर एका बांधकाम प्रकल्पावर काम करत होते. तेथे कामगारांच्या सुरक्षेच्यादृष्टीने कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना साई कन्स्ट्रक्शनचे कंत्राटदार गाडे यांनी केल्या नाही. तसेच सुपरवायझर अंबीगर यांनी कामगारांना सुरक्षा साधने आहेत किंवा नाहीत याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे यादव यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले.













