न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 08 जानेवारी 2025) :- हिंजवडी पोलिसांनी गावठी बनावटीचे दोन पिस्टल आणि काडतुस तरूणाकडून हस्तगत केले आहेत. कुख्यात गुंड शरद मोहोळ टोळीबरोबर हा तरूण ‘कनेक्टेड’ असल्याचा हिंजवडी पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे.
हिंजवडीतील मेझा 9 हॉटेल जवळ सोमवार (दि. 06) रोजी पोलिसांनी ही केली. विकी दीपक चव्हाण (वय19 वर्ष रा. घोटावडे, तालुका मुळशी) असे अटक आरोपीचे नाव आहे.
त्याची पंचासमक्ष साक्ष घेण्यात आली त्यावेळेस वरील मुद्देमाल त्याच्याकडे आढळला. कमरेच्या मागील बाजूस खोसलेले दोन गावठी पिस्टल आणि त्याच्या पॅन्टच्या खिशामध्ये चार काडतुस आढळून आले आहेत. या घटनेचा अधिक तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.
ही कारवाई विनय कुमार चौबे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, डॉ. शशीकांत महावरकर सह पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त, विशाल गायकवाड पोलीस उप आयुक्त परि. 2, सुनिल कु-हाडे सहा. पोलीस आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात, पोलीस निरीक्षक गुन्हे ऋषीकेश घाडगे, तपास पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ पांचाळ, श्रेणी पोलीस उप निरीक्षक अशोक दुधवणे, पोलीस अंमलदार नरेश बलसाने, कैलास केंगले, मधुकर कोळी, प्रशांत गिलबिले, विजय गैंगजे, रवी पवार, कारभारी पालवे, ओमप्रकाश कांबळे, विशाल भोईर, मंगेश लोखंडे यांनी केली आहे.













