- इंदूरीकर महाराजांची कीर्तनसेवा; साई चौक मित्र मंडळ व विलासभाऊ मडिगेरी प्रतिष्ठानचा उपक्रम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. 08 जानेवारी 2024) :- साई चौक मित्र मंडळाच्या वतीने वैष्णोमाता उत्सवानिमित्त गुरुवार (दि. 9) रोजी इंद्रायणीनगर, भोसरी येथील साई चौक, वैष्णो माता मंदिर येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान सायंकाळी 7.30 ते 10.00 या वेळेत ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांची सुश्राव्य कीर्तन सेवा पार पडणार आहे.
या कार्यक्रमास भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे, चिंचवड विधानसभेचे आमदार तथा भाजपा शहराध्यक्ष शंकर भाऊ जगताप, आमदार उमाताई खापरे, आमदार अमित गोरखे तसेच श्री साई चौक मित्र मंडळाचे पदाधिकारी, सदस्य आणि महिला मंडळ अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सकाळी ९.०० ते १२ या दरम्यान दुग्धाभिषेक, होमहवन व आरती, आणि १२ ते ६.३० शास्त्रीय संगीत, भजन तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन साई चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष तथा मा. नगरसेवक विलासभाऊ मडिगेरी आणि कार्याध्यक्ष विलासशेठ भांबुर्डेकर यांनी केले आहे.













