न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जानेवारी २०२५) :- खेड तालुक्यातील वासुली येथील लेबर कॅम्पात कामगारांमध्ये हाणामारीचा प्रकार घडला आहे. लेबर कॅम्पमध्ये काम करण्यासाठी कॉन्ट्रॅक्टर आला होता. त्याने दोघांकडे पाण्याच्या बकेटची मागणी केली. त्यावरून त्यांच्यात वाद झाला.
तसेच दोघांना या लेबर कॉन्ट्रॅक्टरसह त्याच्या दोन साथीदारांनी फावड आणि लोखंडी रॉडने मारहाण करत गंभीर जखमी केले. हा प्रकार रविवार (दि. १२) रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास वासुली येथील एका लेबर कॅम्प मध्ये घडलेला आहे.
याप्रकरणी २७ वर्षीय विकास लक्ष्मी प्रसाद या तरुणाने कमलेश शेठ व त्याचे दोन लेबर कामगार यांच्या विरोधात फिर्याद नोंदवली आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव हे करीत आहेत.
















