- तब्बल सात जणांवर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जानेवारी २०२५) :-काळेवाडीतील तापकीर नगर झोपडपट्टी परिसरात सात जण तीन पत्ती जुगार खेळत होते. पोलिसांच्या गुन्हे शाखा अमली पदार्थ विरोधी पथकाला याबाबत माहिती मिळाली.
पोलिसांनी घटनास्थळी छापा मारत रोख रक्कम, मोबाईल आणि जुगार खेळण्याचे साहित्य असा मुद्देमाल जप्त केला आहे.
बिंदू यादव नावाचा इसम हा जुगार अड्डा चालवित असल्याचे पोलिसांना समजले. ही कारवाई गुरुवार (दि. 16) रोजी सायंकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास पोलिसांनी केली.
काळेवाडी पोलिसांनी जुगार अॅक्ट कलमानुसार कालिदास दिवसे, नथुराम बनकर, सुनील ढोकळ, कबीर सय्यद, अक्षय गुंजकर यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास सपोनि गोसावी हे करीत आहेत.














