न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जानेवारी २०२५) :- वाकडच्या माऊली चौकात होर्डिंग काढण्याच्या कारणावरून एकाला बेदम मारहाण करण्यात आली. त्यात त्याच्या नाकाचे हाड मोडले आहे. ही घटना शुक्रवारी (दि. १७) दुपारी एकच्या सुमारास घडली.
नीलेश शंकर वाघमारे (३७, रा. भाऊसाहेब निवास, वाकड गावठाण) असे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांनी रविवारी (दि. १९) वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, विशाल ऊर्फ साकी संजय गायकवाड (३७, रा. सम्राट कॉलनी, सम्राज हाइटस, दत्त मंदिर रोड, वाकड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुक्रवारी एकच्या सुमारास फिर्यादी हे माऊली चौक, वाकड येथे त्यांच्या जागेत असलेले होर्डिंग काढत होते. त्यावेळी तेथे येत आरोपीने फिर्यादी यांना शिवीगाळ करत लोखंडी रॉडने मारहाण केली. तसेच, नाकावर ठोसा मारल्याने नीलेश वाघमारे यांच्या नाकाचे हाड मोडले.















