- दिनेश यादव यांचे ‘फ’ क्षेत्रीय अधिकाऱ्यांना निवेदन…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 22 जानेवारी 2025) :- प्रभाग क्रमांक अकरा परिसर व कुदळवाडी भागात कचरा समस्या सोडवण्यासाठी रात्रीच्या वेळी व सकाळी कचरा गाडी सुरू करण्यात यावी, अशी मागणी मा. स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी ‘फ’ क्षेत्रीय अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, कुदळवाडी परिसरात कचरा समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. या भागात अनेक कामगार, व्यापारी मोठ्या प्रमाणात वास्तव्य करत आहेत.पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची कचऱ्याची घंटागाडी सकाळी उशीरा येते. त्यावेळेस अनेक कामगार कामाला जातात. त्यामुळे कचरा उचलला जात नाही. ते कामगार कामाला जाताना कचरा रस्त्यावर फेकतात. त्यामुळे परिसर अस्वच्छ होतो.
सकाळी व संध्याकाळी कचरा गाडी या परिसरात सुरू करावी. त्यामुळे कचऱ्याची समस्या सुटण्यास मदत होईल. परिसर स्वच्छ होईल. नागरिक कचरा रस्त्यावर टाकणार नाहीत, असे यादव यांनी निवेदनात म्हटले आहे.











