न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 22 जानेवारी 2025) :- हातउसणे घेतलेले पैसे परत मागितले म्हणुन 52 वर्षीय वाहन चालकाला शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली.
बघुन घेतो म्हणुन धमकी दिली. तसेच डोक्यात वीट मारुन त्यांना जखमी केले आहे. ही घटना मंगळवारी मोरया काॅलनी, विजयनगर, काळेवाडी येथे घडली.
कचरू सूर्यवंशी यांनी रामकृष्ण पाटील यांच्या विरोधात दिलेल्या फिर्यादीवरून काळेवाडी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. सपोनि गायकवाड पुढील तपास करत आहेत.











