- सीमाभिंतीवर साकारणार बारा ज्योतिर्लिंग शिल्पांची प्रतिकृती…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 22 जानेवारी 2025) :- पिंपळे सौदागर येथील पवना नदीलगत प्राचीन महादेव मंदिर येथे महापालिकेने सीमाभिंत बांधली आहे.
या सीमाभिंतीवर १२ जोतीर्लिंग शिल्प बसविण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे.
महादेव मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. तसेच महाशिवरात्रीनिमित्त मोठा उत्सव येथे भरतो. या जोतीर्लिंग शिल्पांमुळा प्राचीन महादेव मंदिर परिसराच्या शोभेत भर पडणार आहे.
सीमाभिंत उभारण्याचे काम सुरु होते. संबंधित मनपा अधिकारी व सल्लागार, ठेकेदार यांना या भिंतीचे सुशोभिकरण करण्याऐवजी १२ जोतीर्लिंग शिल्प बसविण्याबाबत सुचना केल्या होत्या. त्याचे प्रत्यक्षात काम सुरू झाले आहे. महाशिवरात्र उत्सवापूर्वी हे शिल्प बसविण्याचे काम पूर्ण होईल.
– विठ्ठल उर्फ नाना काटे, माजी विरोधी पक्षनेते – पिंपरी-चिंचवड मनपा…











