न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 24 जानेवारी 2025) :- 26 वर्षीय तरुणाने त्याच्या स्टेटसला फिर्यादीच्या मेहुणीचा फोटो ठेवला होता. त्यावरून त्याला जाब विचारला असता तरुणाने त्याच्या साथीदारसह फिर्यादी आणि त्यांच्या नातेवाईकांना शिवीगाळ आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच लाकडी दांडके फिर्यादीचे मेहुणे यांच्या डोक्यात आणि पाठीत घालून त्यांना जखमी केले आहे.
हा प्रकार जगतापनगर, लेन नंबर 3, थेरगाव येथे घडला आहे. व्यंकटेश राठोड यांनी आरोपी चंदू राठोड, श्रीनिवास राठोड, शिवा राठोड आणि त्याचा एक साथीदार यांच्या विरोधात फिर्याद नोंदवली आहे.
काळेवाडी पोलिसांनी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केलेली आहे. पुढील घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कोरडे हे करीत आहेत.












