- पुन्हा दोन बांगलादेशी नागरिकांवर चिंचवडमध्ये गुरुवारी कारवाई…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 24 जानेवारी 2025) :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत बेकायदेशीरपणे बांगलादेशी नागरिक वास्तव्य करत असल्याचे अनेकवेळा निदर्शनास आलेले आहे. त्याविरोधात पोलिसांनी कठोर कारवाई देखील केलेली आहे. परंतु, तरीदेखील बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी अद्याप थांबलेली नाही.
पुन्हा अशीच घटना चिंचवड एमआयडीसी येथील एका हॉटेलच्या पाठीमागे घडली आहे. येथे बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या दोघा बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतल आहे.
शोहग मजुमदर आणि सुमन टीकादार अशी पोलिसांनी अटक केलेल्या बांगलादेशी नागरिकांची नावे आहेत.
ही कारवाई पोलीसांनी गुरुवारी (दि. 23) रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास चिंचवड येथे केली. दोघेही बांगलादेश येथील खुलना भागातील नागरिक आहेत.
याप्रकरणी मोहसीन शेख यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक साळुंखे हे पुढील तपास करीत आहे.
 
                                                                     
                        		                     
							













 न्यूज पीसीएमसी Whatsapp Share करीता आपला मो.नं.रजिस्टर करा.
    न्यूज पीसीएमसी Whatsapp Share करीता आपला मो.नं.रजिस्टर करा.