- घरमालकाचा मयत महिलेच्या पतीवर संशय…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 25 जानेवारी 2025) :- कासारवाडी येथे राहणाऱ्या 22 वर्षीय भाडेकरू महिलेचा अज्ञात इसमाने खून केला आहे. खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
महिलेच्या डोक्यात आणि तोंडावर कशाच्या तरी साह्याने वार करून महिलेला गंभीर जखमी केले. त्यातच या महिलेचा मृत्यू झालेला आहे.
घर मालकाचा मयत महिलेच्या 32 वर्षीय पतीवर संशय आहे. हे दोन्ही दाम्पत्य परप्रांतीय असून ओरिसा राज्यातील रहिवासी आहेत.
याप्रकरणी लांडगे यांनी अज्ञात इसम तसेच मयत महिलेच्या पती विरोधात फिर्याद नोंदवली आहे. दापोडी पोलिसांनी या घटने संदर्भात अज्ञाताच्या आणि संशयिताच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. या घटनेचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाघमारे करीत आहेत.











