न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जानेवारी २०२५) :- जेष्ठ नागरीक संघ व प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या वतीने सेक्टर २८ येथे पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये कार्यरत असणारे दक्ष सुरक्षारक्षक हौसराज गेनबा काळे यांचा सन्मान करण्यात आला.
प्राधिकरण सेक्टर २८ मधील संत ज्ञानेश्वर उद्यान परिसरात अनेक दिवसांपासून शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी शालेय वेळेत उद्यानात तसेच परिसरात दिसून येत असत तसेच काही मुले ही टवाळखोर पद्धतीने परिसरात बेशिस्त वर्तन करत असत. पीएनएसकेएस संस्थेचे पदाधिकारी यांच्या सहकार्याने त्यांनी गेल्या वर्षभराच्या काळात अश्या विद्यार्थ्यांना योग्य समुदेशन केले. त्यामुळे उद्यान परिसरातील बेशिस्त वर्तनाला आळा बसला. त्याचप्रमाणे विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना शालेय जीवनाचे महत्व समजल्याने उद्यानातील बेशस्त टवाळखोरीलाही आळा बसला. त्यामुळे उद्यान परिसरात दरोरोज फिरायला येणारे नागरिक, महिला व जेष्ठ नागरिक यांनी समाधान व्यक्त केले व योग्य पद्धतीने तसेच दक्ष कामगिरी बजावून आपले कर्तव्य सुरक्षितरीत्या बजावल्याने संत ज्ञानेश्वर उद्यानात त्यांचा नागरी सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी प्रमुख उपस्थिती प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष डॉ. विजयकुमार पाटील, जेष्ठ नागरिक संस्थेचे विद्याधर जोशी, अनिल गायकवाड,नाना सौदणकर,काका बोलद्रा, प्रकाश अवचट, नाना शेरकर, बिवलकर अप्पा, शाळीग्राम रनाळकर, काका सोनवणे,सुरेश माळी, पत्रकार भास्कर सोनवणे,माउली रजपूत, अरुण पिंजन, सुनिल नवले, शिवाजी चव्हाण,सागर गायकवाड यांची होती. कार्यक्रमाचे आयोजन व विशेष श्रम सुरेश माळी, गणेश जोशी, कुमार तावरे,सुनिल भगत,सखाराम कोळप, विनय शिंदे यांनी केले.
या प्रसंगी डॉ.विजयकुमार पाटील म्हणाले,”१८ वर्षापेक्षा जास्त काळापासून हौसराज काळे हे प्रामाणिकपणे पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून आपले कर्तव्य बजावत आहेत. संत ज्ञानेश्वर उद्यान येथे त्यांनी सर्वांना वेळेची शिस्त ही सौजन्याने शिकवली.त्यांची दक्ष कामगिरी कौतुकास्पद आहे.”












