न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 26 जानेवारी 2025) :- रावेत, किवळे येथे महापालिकेच्या विकास आराखड्यानुसार कचरा वाहतूक केंद्राचे काम महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून सुरू होते. मात्र, जोपर्यंत कचरा डेपोबाबत निर्णय होत नाही, तोपर्यंत काम सुरू नको, असे सुनावत येथील नागरिकांसह लोकप्रतिनिधींनी आंदोलन करत काम बंद पाडले.
महापालिका हद्दीतील किवळे सर्व्हे नंबर ६६ मध्ये विकास आराखड्यात कचरा वाहतूक केंद्राचे आरक्षण आहे. त्यामुळे महापालिकेने तिथे कचरा वाहतूक केंद्राच्या उभारणीचे काम सुरू केले होते.
कचरा वाहतूक केंद्र रद्द करून, नागरी वसाहतीपासून दूर सुरू करावे, या ठिकाणी असणारे कचरा डेपोचे आरक्षण रद्द करावे, अशी मागणी नागरिकांतून होत होती, तरीही काम करण्यात येत होते. त्यामुळे स्थानिक व लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत कचरा वाहतूक केंद्र आरक्षण रद्द करावे म्हणून मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे सभेत रूपांतर झाल्यानंतर प्रशासनाने कचरा वाहतूक केंद्राचे काम तात्पुरते बंद केले. कचरा डेपोबाबत निर्णय होईपर्यंत काम सुरू करू नये, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.
किवळे-रावेत भागातील सर्व्हे नंबर ६६ मध्ये कचरा वाहतूक केंद्राचे काम सुरू केले होते. या ठिकाणी कचरा वाहतूक केंद्र पाठपुरावा करण्यात आला होता. मात्र, महापालिकेने नागरिकांच्या आरोग्याचा विचार न करता काम सुरू केले, अशी माहिती आंदोलक राजेंद्र तरस यांनी दिली.
किवळे येथे महापालिकेच्या विकास सुरू केले जाईल. आराखड्यानुसार कचरा वाहतूक केंद्राचे आरक्षण आहे. नागरिकांच्या विरोधामुळे काम थांबविण्यात आले. वरिष्ठ पातळीवर निर्णय झाल्यानंतर केंद्राचे काम सुरू होईल.
– संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता महापालिका…












