- दोघांना बेड्या; लॉज मालक फरार…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
चाकण (दि. 28 जानेवारी 2025) :- खेड तालुक्यातील कुरुळी येथे एका लॉजवर वेश्या व्यवसाय सुरू होती. याची कुणकुण पोलीसाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षास मिळाली होती.
त्यांनी सोमवारी (दि. 27) रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास या लॉजवर कारवाई केली.
याप्रकरणी लॉज मॅनेजर उदय प्रकाश, मुली पुरवणारा राम राठोड आणि लॉज मालक सुहास सावंत यांच्या विरोधात महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
तसेच पोलिसांनी दोघांना अटक केलेली असून पुढील घटनेचा तपास सपोनि गुमान हे करीत आहेत.











