- निगडी भक्ती शक्ती ते आकुर्डीतील खंडोबा माळ चौक परिसरात सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणची घटना…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 28 जानेवारी 2025) :- निगडी भक्ती शक्ती ते आकुर्डी ते खंडोबा माळ चौक या दरम्यान मेट्रोचे काम सुरू आहे.
दरम्यान कामासाठी नेमलेल्या सुपरवायझरने डंपर चालकासोबत संगणमत करून कामासाठी आणलेले वीस लाख रुपयांचे अंदाजे चालीस टन वजनाचे लोखंडी स्टील चोरी करून नेले आहे.
हा प्रकार 10 सप्टेंबर 2024 ते 25 जानेवारी 2025 दरम्यान महामेट्रोचे काम सुरू असलेल्या निगडी भक्ती शक्ती ते आकुर्डी खंडोबा माळ येथे घडला आहे.
याप्रकरणी रवी रेडीयार यांनी हरिश्चंद्र सुनील कुमार, महमंद अनीब पटेल या दोघांच्या विरोधात फिर्याद नोंदवली आहे. निगडी पोलिसांनी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करीत त्यांना अटक केली आहे. पुढील घटनेचा तपास सपोनि देशमुख हे करीत आहेत.











