न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 29 जानेवारी 2025) :- खंडणीसाठी अपहरण करून जबरदस्तीने रक्कम चोरणारे रिक्षा चालक व मोबाईल फोन चोरी करणा-या टोळीला चाकण पोलीस स्टेशनच्या डी बी पथकाने दोन तासाच्या आत अटक करून २ लाख रूपये किमतीचा मुद्येमाल जप्त केला आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला कंपनीत काम करणा-या परप्रांतीय व्यक्तीला चाकण ते भोसरी रोडवरील भंडारा हॉटेल समोर दोन अज्ञात रिक्षा चालकांनी रिक्षात बळजबरीने चाकूचा धाक दाखवून बसवून आळंदी रोडवरील घाटामध्ये निर्जन ठिकाणी नेवून चाकूने वार करून मोबाईल फोनमधील गुगल पे मधून ४६,१९०/- रक्कम रूपये दूस-या गुगल पे नंबरला ट्रान्सफर करून लूटमार केली होती. पोलीसांनी तत्काळ रिक्षा मालकाचा शोध घेतला. आरोपींना त्यांच्या राहते घरातून तत्काळ दोन तासाच्या आत ताब्यात घेतले.
1) राजू भगवान गव्हाणे वय १९ वर्षे रा. म्हाडा कॉलनी जवळ म्हाळुंगे ता. खेड, जि. पुणे २) अजय बालाजी भालेराव वय १९ वर्षे रा.आंबेठाण सोनबळवस्ती ता. खेड, जि. पूणे अशी आरोपींची नावे आहेत.
गुन्हयात जबरीने घेतलेली रक्कम तसेच गुन्हयात वापरलेला हत्यार व मोबाईल फोन तसेच वापरलेला रिक्षा असे जप्त करून त्यांना ताब्यात घेतले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह-पोलीस आयुक्त शशिकात महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३ शिवाजी पवार, सहा. पोलीस आयुक्त राजेंद्रसिंह गौर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पोनि गुन्हे नाथा घार्गे, तपास पथकाचे प्रभारी अधिकारी/सपोनि प्रसंन्न ज-हाड, सपोनि/गणपत धायगुडे, तपास पथकातील पोलीस अंमलदार ऋषिकुमार झनकर, सुनिल शिंदे, शिवाजी चव्हाण, हनुमंत कांबळे, भैरोबा यादव, राज जाधव, रेवणनाथ खेडकर, सुनिल भागवत, सुदर्शन बर्डे, पोकों / महेश कोळी, पोशि/बिक्कड, शरद खैरणार, किरण घोडके, लंकावती हांडे यांनी केलेली आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास चालु आहे.


















