न्यूज पीसीएमसी नेटवर्क
आळंदी (दि. 29 जानेवारी 2025) :- दारूबंदी गुन्ह्यातील जप्त देशी आणि विदेशी दारूंचा साठा आळंदी पोलिसांनी नष्ट केला आहे. चार लाखांपेक्षा अधिक रकमेच्या दारूचा यात समावेश आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी ही दारू निर्गत करण्याचे आदेश दिले होते. आळंदी पोलिसांनी उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांच्या साक्षीने हा दारू साठा नष्ट केला आहे.
दारूबंदी गुन्ह्यात ही दारू जप्त करण्यात आली होती. चाकण विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कारवाई केली आहे.











