न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जानेवारी २०२५) :- पिंपरीतील वल्लभनगर गोल मंडई येथे साफसफाई करताना सफाई कर्मचारी सागर डावकर यांना नवीन आयफोन सापडला. त्यांनी तात्काळ आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी व ॲड. सागर चरण युवा मंच यांना संपर्क साधत घटनाक्रम सांगितला.
संत तुकाराम नगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल शेटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरख कुंभार, पोलीस निरीक्षक शशिकांत गाडेकर यांच्या मदतीने हरवलेल्या फोनचे मालक हरीश अमृतकर यांच्याशी संपर्क साधून हरवलेला आयफोन त्यांना परत देण्यात आला.
ॲड. चरण म्हणाले, प्रत्येक नागरिकांनी आपले कर्तव्य वेळेत आणि प्रामाणिकपणे पार पाडले तर हरवलेली मालमत्ता संबंधित धारकास त्वरित परत मिळण्यास मदत होईल. सफाई कर्मचारी डावकर यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक पोलीस व ॲड. सागर चरण युवा मंच यांच्यावतीने करण्यात आले.











