- पिण्याचे पाणी उकळून गार करूनच प्या..
- ही लक्षणे जाणवल्यास थेट दवाखाना गाठा; अंगावर काढू नका…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जानेवारी २०२५) :- Guillain – Barre Syndrome या आजारामध्ये बाधित रुग्णांची प्रतिकारशक्ती मज्जातंतूवर आघात होऊन हा आजार संभावतो. या आजाराची लागण सर्व वयोगटातील व्यक्तींना होऊ शकते. अत्यल्प रूग्णांमध्ये गंभीर स्वरुपाची लक्षणे आढळून येतात. दुषित पाण्याद्वारे या आजाराची बाधा होण्याची शक्यता गृहीत धरून महापालिकेने त्या दृष्टीने उपाययोजना सुरु केल्या आहेत.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात आजअखेर Guillain-Barre Syndrome आजाराचे संशयीत रुग्ण १३ आहेत. यापैकी ५ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आलेले आहेत तसेच सर्व दाखल रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. या आजाराचे रुग्ण आढळून आलेल्या परिसरात सर्वेक्षण करण्याकरिता ८ रुग्णालय झोन अंतर्गत प्रत्येकी दोन असे एकूण १६ पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांमार्फत आजअखेर १० हजार ४३ घरे तपासण्यात आली असून यामध्ये Guillain – Barre Syndrome आजाराचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही.
या आजारावर उपचारासाठी आवश्यक असणारे औषधोपचार पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पिंपरी येथील कै. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व इतर रुग्णालयांत उपलब्ध आहेत. तसेच या आजाराचे उपचार “एकत्रित महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना” मध्ये समाविष्ट असून वायसीएम रुग्णालय आणि नवीन थेरगाव रुग्णालयामध्ये या योजनेअंतर्गत रुग्णांकरिता मोफत उपचार उपलब्ध आहेत. (दि. २९) रोजी या आजाराबाबत आढावा घेणे तसेच वैद्यकीय व्यावसायिकांमध्ये याबाबत जागृती करण्याकरिता वेबिणार चे आयोजन करण्यात आले होते.
या वेबिणार मध्ये ८०२ वैद्यकीय व्यावसायिकांनी सहभाग घेतला. यामध्ये शहरातील नामांकित खाजगी वैद्यकीय डॉ. अनिरुद्ध टोनगावकर, डॉ. पांडे व डॉ. कुलकर्णी यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. मनपा वैद्यकीय विभागतर्फे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे व अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार यांनी मार्गदर्शन केले. महापालिकेचा पाणीपुरवठा होत असताना कोणत्याही परिस्थितीत दुषित पाण्याचा शिरकाव होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश संबधित विभागांना देण्यात आले आहेत. या आजाराची प्राथमिक लक्षणे आढळलेले संशयित रुग्ण ज्या भागात वास्तव्य करतात त्या परिसरात महापालिकेच्या नळाद्वारे पुरविल्या जाणा-या पाण्याचे नमुने तपासण्याची मोहीम तीव्र करण्यात आलेली आहे. हा आजार संसर्गजन्य नसुन रुग्णाच्या संपर्कात आल्याने सदरच्या आजाराची लागण होत नाही. या आजारावर निश्चित औषधोपचार उपलब्ध आहेत. पिंपरी चिंचवड मनपा मार्फत या आजाराच्या माहिती व शंका निरसन करण्यासाठी हेल्पलाईन तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. लक्षणे आढळून आल्यास त्वरित मनपाच्या नजीकच्या रुग्णालयात तज्ञांचा सल्ला घ्यावा. तसेच पिण्याचे पाणी उकळून गार करून प्यावे व उघड्यावरील व न शिजविलेले अन्न खाऊ नये.
आजाराची लक्षणे…
- हातापायातील ताकद कमी होणे.
- हातापायाला मुंग्या (tingling sensations) येणे.
- गिळण्यास व बोलणेस त्रास होणे.
- धाप लागणे/श्वास घेण्यास त्रास होणे.
















3 Comments
🖊 + 0.75991403 BTC.GET - https://telegra.ph/Binance-Support-02-18?hs=802a1360bc25c3addeb6f83c0f4ada5f& 🖊
9aht63
Lisabeth Castagnier
Hi there, I found your website via Google while searching for a related topic, your site came up, it looks great. I’ve bookmarked it in my google bookmarks.
Watch Live Soccer Online
I enjoy your writing style genuinely loving this web site.