न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १३ सप्टेंबर २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी व विकेंद्रित करण्यासाठी महापालिकेने विविध भागांतील जागा प्रस्तावित केल्या आहेत. मोशी कचरा डेपोवरील वाढता भार कमी करण्यासाठी प्रभाग स्तरावर कचरा संकलन, वर्गीकरण व प्रक्रिया व्यवस्था सक्षम करण्याचे नियोजन आहे.
प्रस्तावित जागांवर क्षेत्रफळानुसार दुर्गंधविरहित ट्रान्स्फर स्टेशन, मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी (MRF), बायोगॅस, बायोफ्युएल तसेच प्लास्टिकपासून उपयुक्त उत्पादने निर्मितीचे प्रकल्प उभारले जाणार आहेत. सेक्टर २२, चिंचवड, दत्तनगर, दिघी गायरान, चोविसावाडी, पुनावळे, गवळीमाथा आदी ठिकाणांचा यात समावेश आहे.
जागांची तांत्रिक योग्यता, क्षेत्रफळ, वाहतूक व पर्यावरणीय बाबींची तपासणी सुरू आहे. आवश्यक मान्यता घेतल्यानंतर अंतिम निर्णय होईल.
“पर्यावरणपूरक आणि नागरिकांना कमीत कमी त्रास होईल, अशा पद्धतीने प्रकल्प उभारण्यात येतील,” असे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.
प्रस्तावित करण्यात आलेल्या जागा:-
प्रभाग क्रमांक १७, चिंचवड, आरक्षण क्र. १/८९, सर्व्हे नं. ११३, ११४ व ११६ पैकी
प्रभाग क्रमांक १८, चिंचवड, आरक्षण क्र. २२१ – प्रभाग क्रमांक १०, दत्तनगर, राम मंदिराजवळ
सर्व्हे नं. ७७, दिघी गायरान – चोविसावाडी, आरक्षण क्र. २/१६
पुनावळे, सर्व्हे नं. २३/६/३ पै., २३/६/२ पै., २३/५ पै., २३/१ पै., २३/६/४ पै., २३/२/१ पै. व २३/२/२
पुनावळे, सर्व्हे नं. २६/१/६, २६/३/१ व २६/३/२ पै.
गवळीमाथा
खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील जागेबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे.


















