- सांगवी परिसरात टोळक्याची दहशत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
सांगवी (दि. ०२ फेब्रुवारी २०२५) :- ‘आम्ही शुभम नावळे भाईच्या गॅंगची माणसे आहोत, आमची इथे दहशत आहे, आम्हाला कोणी नडला तर, त्याचा असाच गेम करू’ असे म्हणत सांगवी परिसरात काही टोळक्याने दहशत निर्माण केली. तसेच एका तरुणास कोयत्याने वार करून व दगडफेक करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
रस्त्यावरून जात असताना गाडीला कट का मारला? या कारणावरून काही तरुण दुचाकी गाडीवरून आले व तरुणावर कोयत्याने वार केला. त्याच्या दिशेने मोठ मोठे दगड मारत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या दगडफेकीत दोन गाड्यांचे नुकसान झाले आहे. .
हा प्रकार अभिनवनगर, जुनी सांगवी येथे घडला. याप्रकरणी पोलिसांनी सम्यक लोखंडे, अथर्व लाड, आयुष भोसले, गुरुनाथ बिराजदार यांच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.











