- मध्यस्थीसाठी आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना देखील धक्काबुक्की…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहूगाव (दि. ०३ फेब्रुवारी २०२५) :- खेड तालुक्यातील येलवाडीगाव येथील हॉटेल आंगण परिसरात तिघेजण दारू पिऊन रस्त्यावरच गोंधळ घालत होते. याबाबत पोलिसांनी हस्तक्षेप करीत त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु, या तिघांनी पोलिसांना शिवीगाळ करून दमदाटी केली.
पोलिसांशी झटापट करून त्यांना धक्काबुक्की करीत सरकारी कामात अडथळा आणला. याप्रकरणी पोलीस शिपाई शंकर आडे यांनी आरोपी निलेश बोत्रे, जयवंत पवार, गोरख गाडे (सर्व राहणार येलवाडी, तालुका खेड, जिल्हा पुणे) यांच्या विरोधात महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे.
त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करीत त्यांना अटक करण्यात आली आहे.











