न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मे २०१९) :- पिंपरी चिंचवड शहरातील उद्यमनगरमधील अंतरिक्ष सोसायटी परिसरातील जागेवर कंत्राटदाराने महापालिकेच्या नावाचे खांब रोवले, तसेच कंत्राटदाराकडून याच जागेतील सोसायटीचे फलक देखील काढण्याचा प्रयत्न झाला. कंत्राटदाराने कुठलीही नोटीस न देता केलेला प्रयत्न या कृत्याला सोसाटीच्या सदस्यांनी विरोध केला. त्यामुळे आता अंतरिक्ष सोसायटी आणि कंत्राटदार यांच्यात वाद सुरू झाला आहे.
गेल्या चाळीस वर्षांपूर्वी ही सोसायटी अस्तित्वात आली होती. मात्र या सोसायटीच्या आवारातील जागेचा ताबा महापालिकेने कधी दर्शविला नव्हता. मात्र, आताच महापालिकेला जाग आली आणि याच सोसायटीला कुठलीही नोटीस न देता आवारातील जागेची मोजणी करत सोसायटीचे फलक काढण्याचा प्रयत्न एसआरएच्या कंत्राटदाराकडून झाला.
कंत्राटदारांच्या या बेजबाबदार वागण्यामुळे सोसायटीतील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे, असे सोसायटी व्यवस्थापक उल्का शेडगे यांनी न्यूज पीसीएमसीशी बोलताना सांगीतले.











