न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० फेब्रुवारी २०२५) :- खंडणी दिली नाही म्हणून १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या सात वाहनांची तोडफोड केली. चिखली येथील मोरेवस्तीमध्ये रविवारी (दि. ९) रात्री दोन वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला.
अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कारचालकाने चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. मोरे वस्ती परिसरातील रहिवासी आपली कार, टेम्पो, रिक्षा अशी वाहने रस्त्याकडेला उभी करतात.
दरम्यान, १६ वर्षीय अल्पवयीन मुलगा दारू पिऊन आला. फिर्यादी कारचालक हे त्यांची कार रस्त्याच्या कडेला पार्क करीत होते. त्यावेळी अल्पवयीन मुलगा फिर्यादीजवळ आला. त्यांना धमकावत खंडणीची मागणी केली.


















