- गैरप्रकार आढळल्यास थेट गुन्हा दाखल होणार; पालिका आयुक्तांची माहिती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ फेब्रुवारी २०२५) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा परीक्षा केंद्रांवर कॉपीमुक्त, भयमुक्त व निकोप वातावरणामध्ये परीक्षा पार पाडण्यासाठी सहाय्यक आयुक्त, माध्यमिक शिक्षण विभाग व शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या नियत्रंणाखाली पाच भरारी पथकाची नेमणुक करण्यात आलेली आहे.
या भरारी पथकांमार्फत मनपा हद्दीतील संवेदनशील व असंवेदनशील परीक्षा केंद्रांवर प्रत्यक्ष भेटी देऊन काही गैरप्रकार होऊ नये याची दक्षता घेतली जाणार आहे.
पिंपरी चिंचवड मनपा हद्दीमध्ये एच.एस.सी बोर्ड परीक्षेकरीता एकुण ३३ परीक्षा केंद्रे असुन २५७०० विदयार्थी व एस.एस.सी बोर्ड परीक्षेकरीता एकुण ४८ परीक्षा केंद्रे असुन २८५०० विदयार्थी प्रविष्ठ झालेले आहेत. तसेच पिंपरी चिंचवड मनपा अंतर्गत कार्यरत असणाऱ्या १८ माध्यमिक विदयालयातील मराठी माध्यमाचे २३०० विदयार्थी व उर्दू माध्यमाचे ५०० असे एकुण २८०० विदयार्थी एस.एस.सी बोर्ड परीक्षेकरीता प्रविष्ठ झालेले आहेत.
सर्व परीक्षा केंद्रांच्या केंद्राध्यक्षांना प्रत्येक परीक्षा हॉलमध्ये सी.सी.टी.व्ही कॅमेरे लावण्यासंदर्भात सुचना देण्यात आलेल्या आहेत. ज्या केंद्रावरती गैरप्रकार घडतील किंवा गैरप्रकाराला उद्युक्त करणारे तसेच प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष गैरमार्गाचा वापर करणाऱ्यांवर महाराष्ट्र Prevention of malpractices act. 1982 अंतर्गत दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.



















2 Comments
Kenna Yarwood
It’s hard to find knowledgeable people on this topic, but you sound like you know what you’re talking about! Thanks
MLB Streams Online
Aw, this was a really nice post. In idea I would like to put in writing like this moreover – taking time and precise effort to make an excellent article… but what can I say… I procrastinate alot and certainly not appear to get one thing done.