न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ फेब्रुवारी २०२५) :- ”सरनाईक साहेब प्लिज एकनाथ शिंदे हे देव माणूस आहेत, त्यांचे निर्णय बदलू नका”, अशा आशयाचा फलक (किऑक्स) पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेसमोर रस्त्यावरील विजेच्या खांबावर लावला आहे.
लावणाऱ्याचे त्यावर नाव नाही. तो निनावी आहे. ही हरकत कोणी केली, हे समजू शकले नाही. मात्र, रस्त्यावरून ये-जा करणारे नागरिक यावरील मजकूर वाचून काहीसे अचंबित होत आहेत.
त्यामुळे हा कुतुहुलाचा विषय बनला होता. एरव्ही सजग असणाऱ्या पालिकेच्या अतिक्रमण विभागाचेहि त्याकडे लक्ष कसे गेले नाही? असा सवाल उपस्थित होत आहे.


















