न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मे २०१९) :- कोयत्याचा धाक दाखवून चोरट्यांनी हॉटेलच्या गल्ल्यातील १५ हजारांची रोकड, सोन्याची चेन आणि एक लैपटॉप असा ७० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना मंगळवारी (दि. १४) रोजी रात्री पावणेदोनच्या सुमारास ताथवडे येथे घडली.
याप्रकरणी राहुल प्रसाद मापारी (वय ३२, रा. ताथवडे) यांनी वाकड पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीचे ताथवडे येथे कबाब अँड बिर्याणी कॉर्नर नावाने हॉटेल आहे.
मंगळवारी रात्री पावणेदोनच्या सुमारास मापारी हॉटेल बंद करताना आरोपी त्या ठिकाणी आले. त्यांनी मापारी यांना कोयत्याचा धाक दाखवून १५ हजारांची रोकड, १५ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन आणि १० हजार रुपये किमतीचा लॅपटॉप असा ७० हजाराचा मुद्देमाल जबरदस्ती चोरून नेला.











