न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ फेब्रुवारी २०२५) :- रावेत येथील इमारतीमधील गाळे पोस्ट ऑफीसाठी महापालिका भाडे तत्वावर देणार आहे. पुणे ग्रामीण डाकघर विभागाचे अधिक्षक यांनी रावेत येथील स. न. ९५ पै. मधील आ. क्र. ४/९४ पार्किंग, ४/९५ शॉपिंग सेंटर कम मार्केट मधील चार गाळे पोस्ट ऑफीसाठी भाडे तत्वावर मिळावे, अशी मागणी केली होती. त्यानुसार रावेत पोस्ट ऑफिससाठी चार गाळे भाडे तत्वावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
मासिक भाडे दर र.रु. ३६.२२/- प्रति चौ. फुट (मनपा सर्व कराव्यतिरीक्त) असा ठरला आहे. शॉपिंग सेंटर कम मार्केटमधील दुस-या मजल्यावरील गाळा क्र.२०१,२०२,२०३ व २०४ यांचे एकूण क्षेत्रफळ ८१०.८८ चौ. फुट आहे.
उप संचालक नगररचना विभाग यानी निर्धारित केलेल्या दरानुसार त्याचे मासिक भाडे दर र.रु.२९,३७०/- (मनपा सर्व कराव्यतिरिक्त) असे होत आहे. त्यास स्थायी समिती सभेत महापालिका आयुक्तांनी नुकतीच मान्यता दिली.














