- एकाच ठेकेदाराला पुन्हा सात महिन्यांची मुदतवाढ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ फेब्रुवारी २०२५) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने मुदत संपूनही एकाच ठेकेदाराला पुन्हा सात महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. त्यास आयुक्त तथा प्रशासक यांनी स्थायी समिती सभेत मंजुरी दिली आहे.
शहरातील अनाधिकृत जाहिरात फलकांचे सर्वेक्षण करुन ते फलक स्ट्रक्चरसह स्वखर्चाने काढण्यासाठी व मनपा हिस्सा जमा करण्यासाठी एजन्सीची नेमणूक करण्यात आली आहे. त्यासाठी ऑनलाईन ई-निविदा दर मागविण्यात आले होते. त्यात मे. अरबाज इंजिनिअरिंग सिव्हिल कन्स्ट्रक्शन यांनी अधिकतम ९९ टक्के दर सादर केला. त्यानुसार मे. अरबाज इंजिनिअरींग आणि श्री.गणेश एन्टरप्रायजेस यांना कामाचा आदेश देण्यात आला होता. त्यानंतर कामाचा निपटारा जलदगतीने होण्यासाठी पुन्हा नव्याने ९९ टक्के दराने लॉजिस्टो टेक्रॉलॉजिस व मुझिव अजिज शेख यांना कामाचा आदेश देण्यात आला होता. कामाची मुदत (दि. ११/०१/२०२४) रोजी संपल्याने त्यांना १ वर्ष मुदतवाढ देण्यात आली होती.
दरम्यान कामाची मुदत (दि.११/०१/२०२५) रोजी संपली. त्यानंतर दरपत्रक प्रसिध्द केले असता समाधानकारक दर प्राप्त न झाल्याने (दि. १६/०१/२०२५) रोजी पुन्हा नव्याने दरपत्रक प्रसिध्द करण्यात आले आहे. या कामास साधारण १ महिन्याचा कालावधी लागणार असल्याने निविदेस ७ महिने किंवा निविदा कार्यवाही होईपर्यंत मुदतवाढ घेणे आवश्यक आहे. त्यानुसार गणेश एन्टरप्रायजेस यांना (दि.१२/०१/२०२५ ते ३१/०७/२०२५) पर्यंत कामाची मुदतवाढ अथवा निविदा कार्यवाही पूर्ण होईपर्यंत मान्यता देण्यात आली आहे.














