- पालिका आयुक्त शेखर सिंह यांचा आदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ फेब्रुवारी २०२५) :- पिंपरी चिंचवड महापालिका सेवेतील ‘गट अ ते ड’ संवर्गातील पदांवर पदोन्नती देताना लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. आयुक्त शेखर सिंह यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.
महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम २००५ राज्यभरात लागू करण्यात आला असून, २००५ नंतर जन्माला आलेल्या अपत्यांची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करणे बंधनकारक आहे.
महापालिका सेवेत दाखल होतानादेखील हा अधिनियम लागू करण्यात आलेला आहे. मात्र, पदोन्नती देत असताना अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून याबातची खरी माहिती दिली जात नसल्याच्या तक्रारी महापालिका प्रशासनाला प्राप्त होत असतात.














